Loading...
88063 27174



संघटनेचे उद्देश





आपल्या सर्वांना कल्पना आहेच की विद्युत क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण विविध भूमिका बजावत असतो. कोणी लाईनवर प्रत्यक्ष काम करतो तर कोणी ऑफिस मध्ये काम करतो. कोणी सबस्टेशन ऑपरेट करतो अशा अनेक प्रकारच्या भूमिका आपण सतत बजावत असतो. परंतु अतिशय सूक्ष्म निरीक्षण केले असता आपल्या निदर्शनास येईल की वीज उद्योगात वर्ग, अनेक संघटना विभागल्या आहेत. कामगारांचे एकत्रितकरण् या शब्दा विरुद्ध एक प्रकारे विभाजनच होताना दिसत आहे.

परंतु आज आम्ही आपल्यासमोर एका नवीन सामजिक बांधिलकीच्या भूमिकेतुन म्हणजेच महाराष्ट्र बाह्यस्त्रोत वीजकंत्राटी कामगार संघटना माध्यमातून असंघटित बाह्यस्त्रोत कामगार घेऊन आम्ही समाजाला देखील आपल्यासोबत प्रवाहात घेऊन सामजिक भान असलेल्या प्रत्येक माणसाला एकत्र करून समाजाला काही तरी देण्यासाठी या महाराष्ट्र बाह्यस्त्रोत वीजकंत्राटी कामगार संघटना आम्ही स्थापना केली आहे.

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उक्ती प्रमाणे आम्हाला १०० % विश्वास आहे की हे ईश्वरी काम करताना वेळोवेळी आम्हाला आणि आपल्या सर्वांची निश्चितच मदत होईल. सामाजिक जीवनात वावरत असताना आपण देखील समाजाला काही देणं लागतो हेच देणे आपण महाराष्ट्र बाह्यस्त्रोत वीजकंत्राटी कामगार संघटना माध्यमातून देऊ शकतो व एकीचे नवीन उदाहरण या समाजापुढे तयार करू शकतो धन्यवाद ...